
देवगड : मुंबई उच्च न्यायालयाचा आदर करून महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी महाराष्ट्र बंद चा निर्णय मागे घेतला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार, कॉग्रेस चे नाना पटोले प्रसार माध्यमांंवर प्रतिक्रिया देऊन शिवसेना पक्षप्रमुुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंद मागे घेतला आणि काळ्या फिती लावून निषेध नोंदवा असे आवाहन जनतेला केले होते. त्यानुसार बदलापूर घटना अतिशय निंदनीय व संतापजनक असल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी देवगड तालुक्यातील देवगड शहरात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती बांधून शनिवार २४ ऑगस्ट बदलापूर घटनेचा निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, तालुका प्रमुख जयेश नर,युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव, भारतीय काँग्रेस अध्यक्ष उमेश कुळकर्णी युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर, तालुका अध्यक्ष सुरज घाडी, महिला आघाडी तालुका प्रमुख हर्षा ठाकूर, सायली घाडीगांवकर, श्रुती करंदीकर, माधुरी ठुकरुल, विक्रांत नाईक, विजय कुळकर, योगेश गोळम, वेदांग करंदीकर, बाळा कणेरकर, नगरसेवक निवृत्ती तारी, विशाल मांजरेकर, नितीन बांदेकर, भारतीय काँग्रेसचे सजाउद्दीन सोलकर, तुषार भाबल, रामदास कोठारकर आदी महविकास आघडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवगड येथील आय लव्ह देवगड येथील सेल्फी पॉइंट च्या ठिकाणी हा निषेध नोंदवण्यात आला.