देवरुखात 'मविआ'कडून बदलापूर अत्याचाराचा निषेध

Edited by: मनोज पवार
Published on: August 24, 2024 10:10 AM
views 258  views

देवरुख : मुंबई उच्च न्यायालयाचा आदर करून महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी  महाराष्ट्र बंद चा निर्णय मागे घेतला. याबाबत  राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार, कॉग्रेसचे नाना पटोले प्रसार माध्यमांंवर प्रतिक्रिया देऊन शिवसेना पक्षप्रमुुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंद मागे घेतला आणि काळ्या फिती लावून निषेध नोंदवा असे आवाहन जनतेला केले होते.  

त्यानुसार बदलापूर घटना अतिशय निंदनीय व संतापजनक असल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती बांधून आज शनिवार (दि.२४ ऑगस्ट ) बदलापूर घटनेचा निषेध केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्याशेठ बोरुकर, माजी उपसभापती अजित गवाणकर, शहरप्रमुख दादा शिंदे, मुन्ना थरवळ, युवासेना उप तालुकाप्रमुख तेजस भाटकर, सचिन शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष निलेश भुवड, संदेश जाधव, शाखाप्रमुख विनोद माने, मुबीन पटेल, संतोष शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.