स्वच्छता निरीक्षकपदी बढती

Edited by: विनायक गांवस
Published on: August 24, 2024 09:31 AM
views 318  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या तीन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नव्याने स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नतीने बढती मिळाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे नगरपालिका व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.  

यामध्ये प्रवीण कांबळे यांना वेंगुर्ला, निवेद कांबळे यांना दोडामार्ग तर सतीश सांगेलकर यांना वैभववाडी येथे स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत असून भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने या सर्वांचा अभिनंदन करण्यात आले आहे.