
दोडामार्ग : दोडामार्ग बांदा राज्यमार्गवर मणेरी येथे पडलेले खड्डे चिखल व धुळीच्या सामराज्यामुळे येथील वाहन चालकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. हे पडलेले खड्डे गणेश चतुर्थीच्या अगोदर म्हणजे आठ दिवसात बुजवा अन्यथा सर्व ग्रामस्थ तसेच वाहन चालकांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे येथील उपस्थित ग्रामस्थ वाहन चालकांनी सांगितले.
दोडामार्ग बांदा राज्यमार्ग मागच्या वर्षी केला. पण त्याच मार्गवरील मणेरी येथील 2 किमी अंतराचा रस्ता का केला नाही? याचा सर्व मणेरी ग्रामस्थ व ये जा करणाऱ्या वाहन चालकातून केला जात आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हेच समजतं नाही. गतवर्षी दोडामार्ग बांदा मार्ग नव्याने डांबरीकरण करून सुरळीत केला होता. मात्र मणेरी येथील काही अंदाजे 2 किमी लांबीचा रस्ता जाणून बुजून केला नाही की काय कारण होते हे सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे असे सांगण्यात येत आहे. गणेश चतुर्थीच सण तोंडावर आला आहे. आणि याच रस्त्यातून चाकरमानी व नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे काय? असा संतापजनक सवाल विचारला जाता आहे. याच पार्श्वभूमीवर आज मणेरी येथील उपसरपंच विशाल परब, ग्रामस्थ व युवासेनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस, ग्रामस्थ रवी नाईक, सुरज प्रसादी, मधू कुबल, सेनेचे दोडामार्ग शहर प्रमुख योगेश महाले, पाटये गावचे सरपंच प्रवीण गवस यांनी आज मणेरी येथे पडलेल्या खड्ड्यात उभे राहून गणेश चतुर्थीच्या म्हणजे येत्या आठ दिवसात पावसाळी डांबर वापरून खड्डे बुजवा अन्यथा रास्ता रोको या रात्यावर खड्यात बसून करू असा सार्वजनिक बांधकाम विभागला दिला आहे.
मंत्री केसरकर - बांधकाम मंत्री डोळे बंद करून रस्त्यावरून गेले काय ? : मणेरी उपसरपंच विशाल परब
दोडामार्ग बांदा राज्यमार्ग व मणेरी येथील पडलेले खड्डे याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे. दोडामार्ग नगरपंचायातच्या मच्छी मार्केट लोकार्पण वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आले होते ते याच रस्त्यावरून गेले पण त्यांना हा रस्ता व पडलेले खड्डे दिसले नाही काय ? येताना जाताना ते डोळे बंद करून आले आणि गेले काय असा संतापजनक सवाल येथील उपसरपंच विशाला परब यांनी केला आहे. मग बांधकाम मंत्री चव्हाण यांनी तात्काळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावू तात्काळ डांबर घालून हे खड्डे बुजवा असे आदेश दिले पाहिजे होते. तसे नकर्ता ते आपले डोळे बंद करून आले आणि निघून गेले हे कितपत योग्य आहे याच उत्तर त्यांनी द्याव व 2 ते 3 दिवसात या रात्यावर पडलेले खड्डे पावसाळी डांबर वापरून बुजवावे अन्यथा मी मणेरी उपसरपंच या नात्याने सांगतो की सर्व ग्रामसताना घेऊन रास्तारोको करणार आहे हे लक्षात ठेवा.
जीव गेल्या नंतरच खड्डे बुजवणार काय ?
दरम्यान युवासनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस, व ग्रामस्थ रवी नाईक हे बोलताना म्हणाले की इथल्या सरकार व सार्वजनिक बांधकाम विबगाला एखाद्या नागरिकाचा जीव गेल्या नंतर या ठिकाणी पडलेले खड्डे हे बांधकाम विभाग बुजविणार असं वाट. सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. याचा फायदा घेत बांधकाम विभागाने डांबर घालून तात्काळ खड्डे बुजवावे, खड्डे तात्काळ बुजविले नाही. तर रास्ता रोको सारखे आंदोलन करण्यास मागे हटणार नाही पाटये सरपंच प्रवीण गवस यांनी यावेळी बांधकाम विभागाला धमकीवजा इशारा दिला आहे.