
सावंतवाडी : ७८व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त व नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि राऊळ यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त नेमळे विद्यालयात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. लहान गट पाचवी ते आठवी व मोठा गट नववी ते दहावी अशा दोन गटांत स्पर्धा पार पडली.
लहान गटात-आठवी ब प्रथम सतरंगी रंगोसा उज्ज्वल सा पावन ऐसा देश (गीत) द्वितीय क्रमांक सहावी - नन्ना मुन्ना राही हू (गीत) तृतीय क्रमांक आठवी -चला चला हो एक मुखाने (गीत) मोठ्या गटातून प्रथम दहावी ब - सबसे उंची विजय पताका (गीत)
द्वितीय क्रमांक नववी अ-गे माय भू तुझे (गीत)तृतीय क्रमांक-बारावी - उंच उंच गगनात तिरंगा हे मानकरी ठरले. परीक्षण राजेश गुडेकर व संगीत विशारद केतकी सावंत यांनी केले. नितिन धामापूरकर व तबला विशारद निरज भोसले यांनी संगीत साथ केली. सर्व विद्यार्थ्यांना श्री. धामापूरकर यांचे मार्गदर्शक लाभले. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तसेच कार्यकारी अधिकारी प्रभूतेंडोलकर व डॉ. हेमंत कुमार सावंत यांच्या हस्ते नववीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. तसेच शाळेतील मुलांना शुध्द पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टरचे फित कापून उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राऊळ व सचिव आळवे यांच्या हस्ते झाले. वॉटर फिल्टरसाठी आर्थिक सहकार्य परशुराम राऊळ, माजी प्राचार्या सौ. रेश्मा भाईडकर, माजी क्लार्क नयन गावडे, समीर बाक्रे यांनी केले. उमेश राऊळ यांनी वॉटर फिल्टरसाठी प्रयत्न केले.