
सावंतवाडी : निरवडे भंडारवाडी येथील कोकण रेल्वे मार्गावर वरून ये-जा करण्यासाठी बॉक्सवेल किंवा ओव्हर ब्रिजसाठी मंजुरी देण्यात यावी अशी मागणी खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निरवडे सरपंच सुहानी गावडे व उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी केली.
यावेळी यासाठी आवश्यक असणारा निधी निश्चितच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी सरपंचांना दिले.याबाबतच्या मागणीचे निवेदन खासदार नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे. निरवडे येथील भंडारवाडी येथून कोंकण रेल्वे मार्गाच्या अलीकडे व पलीकडे शेतकर्यांची शेती असल्याने नियमित जाणे येणे, तसेच गुरे ने-आण करणे गरजेचे असते. रुळांच्या अलिकडे पलिकडे वस्ती आहे. आतापर्यंत या मार्गावर अनेकांची जनावरे व लोकांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ये-जा करणे करीता बॉक्सवेल किंवा ओव्हर ब्रीज होणे अंत्यत आवश्यक आहे. त्यामुळे त्याला तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान नक्कीच याला मंजुरी देऊ असे आश्वासन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.