संदेश शिरोडकर कुटुंबियांना आर्थिक मदत !

Edited by: दिपेश परब
Published on: August 10, 2024 10:29 AM
views 294  views

वेंगुर्ला : तालुक्यातील होडावडा येथील रहिवासी वीज वितरण विभागाचा बाह्यस्रोत कर्मचारी संदेश शिरोडकर याचा काही दिवसांपूर्वी वीज दुरुस्तीची सेवा बजावण्यासाठी जात असताना अपघात झाला होता. यात तो गंभीर जखमी होऊन गोवा बांबूळी येथे उपचार घेत होता. 

     दरम्यान संदेश याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने त्याच्या उपचाराकरिता अणसूर ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे व बाबुराव गावडे यांनी मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्या प्रतिसादातून तब्बल ४० हजार ५३ रुपये मदत जमा झाली. ही मदत ९ ऑगस्ट २०२४ रोजी त्याच्या होडावडा गावातील राहत्या घरी जाऊन संदेश शिरोडकर यांच्या वडिलांच्या हाती अणसूर सरपंच सत्यविजय गावडे यांनी सुपूर्द केली व त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी अणसूर ग्रामस्थ भास्कर शंभू गावडे, विजय देऊ गावडे, सचिन रावजी गावडे, राकेश गावडे, प्रभाकर गावडे आदी उपस्थित होते.