
देवगड : देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल निलेश नानासाहेब पाटील यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे १६ मार्च २०२४ ते ४ जून २०२४ या कालावधीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये गोपनीय माहिती अत्यंत उत्कृष्टपणे संकलित करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या गौरवाबद्दल देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर,पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. अशाच प्रकारे उत्कृष्टपणे कर्तव्य बजावून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल तथा महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उज्ज्वल कराल अशी आशा ही या प्रशस्तीपत्रकाद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.