
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात महसूल विभागाचा महसूल पंधरवडा १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमूख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले आहे.
जिल्हयामध्ये ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान "महसूल पंधरवडा" यशस्वीरित्या राबविणेसाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे. तालुकास्तरीय कार्यक्रम प्रत्येक तहसिल स्तरावर होणार आहेत.