
दोडामार्ग : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे अपुरे रस्ते, गटारे, रस्त्यालगत असलेली धोकादायक झाडे तात्काळ कट करून रस्त्याची आठ दिवसात दुरुस्ती करा अन्यथा दोडामार्ग उबाठा शिवसेना भव्य आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.
दोडामार्ग विजघर रस्त्यावर साईडपट्टी तसेच जीर्ण झाडे यामुळे वारंवार अपघात होत आहेत. हे होणारे अपघात व सर्व समस्या दुर करण्यात याव्यात यासाठी तालुका प्रमुख संजय गवस, शिवसेना उबाठा च्या वतीने, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले की दोडामार्ग विजघर रस्त्यालगत अनेक जीर्ण झाडे आहेत ही झाडे कधीही पडून मोठा अपघात होऊ शकतो. ती झाडे तसेच रस्त्यालगतची दुतर्फा वाढलेली झाडी साफ करावी. तसेच या रात्यालगत जिओ व बीएसेनेल ची केबल टाकण्यासाठी खोद काम केल्याने रस्त्याची साईडपट्टी कमकुवत झालि आहे. तसेच लगतचे गटार हे मातीभरावाने भरले असून गटारातले पाणी हे पूर्णपणे रस्त्यावर येऊन रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे या सर्व विषयाकडे गाभीर्याने लक्ष घालून तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आठ दिवसात उबाठा शिवसेना भव्य आंदोलन छेडणार आहे.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचा भडीमार केल्या.. तसेच दोडामार्ग ते बिजघर महामार्ग वर धोकादायक असलेली झाडे तोडण्यात यावी तसेच दोडामार्ग शहर.. भेडशी मार्गावर, तेथील गटारे मुळे पावसाळ्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते.. ती गटारे खुली करण्यात यावी.. तसेच भेडशी पूल नजिक योग्य उपाययोजना करण्यात यावी.. तालुक्यात इतर मार्गातील धोकादायक झाडे तोडण्यात यावी.. याबाबत कार्यकारी अभियंता किणी याबाबत येत्या आठ दिवसात सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे.. तशा सूचना शाखा अभियंता घंटे यांना देण्यात आल्या.तालुका प्रमुख संजय गवस, नगरसेवक चंदन गावकर, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, युवा सेना तालुकाप्रमुख राणे, उपजिल्हा संघटक विजय जाधव, महिला उपजिल्हाप्रमुख विनीता घाडी, सुनील गवस, सचिन केरकर , संजय कांबळे, महेश नाईक, नितीन गवस, उमेश चिरमुरे, शुभम सुतार, विश्वनाथ सुतार आदी सही शिवसैनिक उपस्थित होते.










