
दोडामार्ग : मांगेली येथे घडलेली घटना ही केवळ अन केवळ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घडलेली आहे.याठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवणे आवश्यक असताना दुर्दैवाने तसे होत नसल्याने दर आठवड्याला अशा घटना घडत असतात. सोमवारीही अशीच घटना घडली.मी व माझे दोन मित्र असे आम्ही मांगेलीत गेलो होतो.यावेळी मांगेलीला कर्नाटकातील काही युवक आपल्या दुचाकी घेऊन त्याठिकाणी आले आणि हुल्लडबजी केली.त्याबाबत विचारणा केली म्हणून आम्हाला मारहाण केली. याबाबत आम्ही नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना माहिती दिली .खरे तर त्यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केसरी येथे भेटायला बोलावले होते पण त्यांनी तिथे न जाता आपले मित्र संकटात असल्याने त्यांना वाचविण्यासाठी मांगेलीत आले. खर तर मारामारीसाठी ते आलेच नव्हते तसे असते तर ते आपल्यासोबत आणखिन लोकांना घेऊन आले असते. मात्र त्या नशेत असलेल्या युवकांनी चव्हाण यांचे ऐकून न घेता त्यांच्याशीच हुज्जत घातली. एवढ्यावरच न थांबता बेसावध असलेल्या चव्हाण यांच्यावर दगड मारला. खरं तर चव्हाण आमच्यासाठी पांडुरंग बनुनच आले.ते आले नसते तर त्या युवकांनी आमच्या जीवाचे बरे वाईट केले असते, असे समीर रेडकर म्हणालेत.
मित्रांसाठी धावून जाणार नेता म्हणून ते परिचित आहेतच पण हे त्यांनी सोमवारी करून दाखविले. पण त्यांच्या राजकीय विरोधकांनी या घटनेचा विपर्यास करण्यास सुरुवात केली असून त्यांच्याबद्दल अपप्रचार सुरू केला आहे.ज्यांना मैत्री या शब्दाचा अर्थच माहीत नाही ज्यांनी अनेकांच्या पाठीत मैत्रीचे ढोंग करून खंजीर खुपसण्याचेच काम आतापर्यंत केले तिच लोक असा अपप्रचार करू शकतात.मित्र संकटात ढाल बनून उभा राहणारा असावा असं म्हणतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण चेतन चव्हाण यांचे आहे .त्यामुळे चव्हाण यांच्या नखांची सर अपप्रचार करणाऱ्याना येणार नाही.त्यांनी कृष्ण - सुदम्याचा कितीही मुखवटा स्वतःला घातला तरी ते तसे होऊच शकत नाहीत. हे दोडामार्गची जनता ओळखून आहे त्यामुळे त्यांनी हे धंदे आता बंद करावेत.राहिला विषय मांगेलीचा तर अशा घटना त्याठिकाणी वारंवार होत असतात .
दारू आणि गांजाच्या नशेत हुल्लडबजी करणे , बीभत्स वर्तन करणे असे प्रकार होतात .स्थानिकानाही अरेरावी केली जाते. त्यामुळे बेळगावहुन येणाऱ्या रस्त्यावर आणि मांगेलीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे. मांगेली सडा मार्गे बेळगावात जाणाऱ्या या रस्त्याचा वापर अवैध्य कामांसाठी सर्रास केला जातो. प्राण्यांच्या मासांचीतस्करीही येथूनच केली जाते त्यामुळे याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणीही त्यांनी केलीय.