वैश्य समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 06, 2024 14:30 PM
views 156  views

सावंतवाडी : वैश्य समाजाच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उद्या सायंकाळी ४ वाजता येथील वैश्य भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तसेच यावेळी होतकरू विद्यार्थ्यांना गणेशवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. 

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष सुनील भोपटे यांच्यासह व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन वैश्य समाजाचे अध्यक्ष रमेश बोंद्रे यांनी केले आहे.