लळीत बंधुंना मातृशोक !

Edited by: संदीप देसाई
Published on: January 22, 2024 11:35 AM
views 279  views

दोडामार्ग : दोडामार्ग आडाळी येथील इंदिरा रामचंद्र लळीत, वय ९४ यांचे दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

किर्लोस्कर ब्रदर्स लि.चे निवृत्त कर्मचारी अजीत, एस.टी महामंडळाचे निवृत्त वाहक शेखर, मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश, बोरा कॉलेज, शिरुरचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळकृष्ण, कै. ललिता (स्नेहा काजरेकर, मालवण) यांच्या त्या मातोश्री होत.

लळीत गुरुजी या नावाने प्रसिद्ध असलेले कै. रा. धों लळीत यांच्या त्या पत्नी होत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संसार करताना आपल्या मुलांच्या शिक्षणावर विशेष भर दिला आणि त्यांच्यावर सुधारकी विचारांचे संस्कार केले. त्यांच्यावर आज आडाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.