किर्ती सेल्स मोबाईलची १८ वी शाखा आता सावंतवाडीत !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 12:33 PM
views 105  views

सावंतवाडी : अत्याधुनिक ग्राहक सेवा देणारी कोल्हापूरमधील मोबाईल रिटेल चेन खास सावंतवाडीतील ग्राहकांसाठी सोहराब बेग यांनी उपलब्ध करून दिली आहे. किर्ती सेल्स मोबाईलची १८ वी शाखा आता सावंतवाडी येथे सुरु झाली आहे. या किर्ती सेल्स मोबाईल गॅलरी च्या या १८ व्या शाखेचा शुभारंभ बुधवारी सुलेमान बेग यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी टी. आर. पाटील, सोहराब बेग, शागुफ्ता बेग, ज्योती पाटील, विनायक पटांगे, थॉमसन कोचरेकर, नितीन मोरे, सुरज धावडे, म़ंदार पावसकर, बापतीस डिसोझा, चंद्रकांत होडावडेकर, राखी गांवकर, दर्पण होडावडेकर, निदीम मुल्ला आदी उपस्थित होते. किर्ती मोबाईल गॅलरी ही चिटणीस कॉम्प्लेक्स, बापू साहेब पुतळ्या समोर, जे.पी. रेफ्रिजरेशन शेजारी सुरु झाली आहे. जे.पी. रेफ्रिजरेशन प्रमाणेच चांगली व दर्जेदार सेवा ग्राहकांना दिली जाईल अशी ग्वाही सोहराब बेग यांनी यावेळी दिली.