कुणकेश्वर महाशिवरात्रीच्या प्रथम पूजेच्या मानासाठी किरण सामंतांना निमंत्रण !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 04, 2024 14:13 PM
views 61  views

देवगड :  देवगड येथील दक्षिण कोकण ची काशी म्हणून संबोधले जानाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथे उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांची सदिच्छा भेट घेऊन श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री जत्रौउत्सवा निमित्त श्री देव कुणकेश्वराची पहिल्या दिवशीची प्रथम पूजा आपल्या शुभ हस्ते व्हावी यासाठी उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांची श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथे भेट घेऊन यात्रा उत्सवाचे निमंत्रण देत प्रथम पूजेला येण्या साठी विनंती पत्र देऊन केली आहे.

दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले जाणारे तसेच श्री शेत्र कुणकेश्वर हे एक धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून श्री.क्षेत्र कुणकेश्वर नावारूपास आले आहे. या ठिकाणी वर्षभरामध्ये लाखो भाविक यात्रेकरु येऊन भेट देत असतात. ‘कोंड नेस्ट ट्रॅव्हलर’ तर्फे प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये जागतिक ३० सुंदर पर्यटन स्थळांमध्ये भारतातील उल्लेखिलेल्या ०९ स्थळांमध्ये श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. हि बाब आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे.

या तीर्थक्षेत्री दरवर्षी लाखो शिवभक्त व यात्रेकरूंच्या उपस्थितीमध्ये मोठी यात्रा भरते. प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी शुक्रवार दि. ०८ मार्च २०२४ ते रविवार १० मार्च २०२४ या कालावधीत श्री क्षेत्र कुणकेश्वर मध्ये महाशिवरात्री यात्रा मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.

दरम्यान गुरुवार दि. ०७ मार्च २०२४ रोजीच्या रात्रौ १२:०० वा. नंतर (दि. ०८ मार्च २०२४ मध्यरात्रौ ठिक ०१:०० वा.) “श्रीं” ची प्रथमपूजा परंपरेनुसार केली जाणार आहे.दरवर्षी मंदिरामध्ये प्रथम पुजेचा मान देवस्थानचे देणगीदार तसेच मंत्री महोदय अशा मान्यवरांना देण्यात येत असतो. तरी या वर्षीचा प्रथमपूजेचा मान आपण स्विकारावा आशा आशयाचे पत्र उद्योजक किरण सावंत यांना श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कणकवली येथे भेट घेऊन देण्यात आले.

यावेळी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, संजय आचरेकर, अजय नाणेरकर, राम तेजम आदी उपस्थित होते.