किरण सामंत दोन दिवस सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 05, 2024 16:12 PM
views 63  views

कणकवली :  शिवसेनेचे नेते, रत्नसिंधु समृद्धी योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिक्रेट असोसिएशनचे उपाध्यक्ष उद्योजक किरण सामंत हे ७ आणि ८ मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना भेटी देतानाच महाशिवरात्री निमित्त देवदर्शन आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटगाठी ते घेणार आहेत. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर आणि सुनील पारकर यांनी दिली.येथील शिवसेना कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी महेंद्र सावंत, हरेश पाटील, शेखर राणे आदी उपस्थित होते. 

सुनील पारकर म्हणाले, शिवसेना नेते किरण सामंत हे ७ मार्चला दुपारी ३ वा. रत्नागिरी येथून खारेपाटण येथील शिवसेना कार्यालयात आगमन होणार आहे. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथील शाळा नं. १ येथे भेट देणार आहेत. सायंकाळी ४ वा. कुडाळ पिंगुळी येथील महिला उद्योजिका मेळावा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. रात्रौ ८ वाजता -आचरा विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी. रात्रौ ९:३० वा. राखीव, रात्रौ ११ वा. देवगड कुणकेश्वर मंदिर येथे मानाच्या पहिल्या पूजेसाठी उपस्थिती राहणार आहेत. ८ मार्चला सकाळी ९ वा. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेस उपस्थिती. सकाळी ९.३० वा. कोलगांव येथे जगदीश मांजरेकर दत्त मंदिर येथे सदिच्छा भेट. सकाळी १० वा.  कलेश्वर मंदिर नेरूर येथे महाशिवरात्री निमित्त भेट.सकाळी ११ वा. तालुका शिवसेना कार्यालय येथे शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, औद्योगिक क्षेत्र प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांची सदिच्छा भेट, भजन संघटना पदाधिकारी, दशावतारी संघटना पदाधिकारी, शैलेश परब यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज बांधवांच्या गाठीभेटी. दुपारी १२.३० वा. बावं येथे महाशिवरात्री निमित्त भेट. दुपारी २.३० वा. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी. दुपारी ३ वा. झाराप येथे पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ४ वा. खानोली येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ४.३० वा. हुमरमळा वालावल येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ६ वा. श्री काशिकलेश्वर मंदिर कलमठ (ता. कणकवली) येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर किरण सामंत रत्नागिरीच्या दिशेने जाण्यासाठी रवाना होणार आहेत. अशा प्रकारचा शिवसेना नेते किरण सामंत यांचा जिल्हा दौरा असणार आहे असे सुनील पारकर यांनी सांगितले.