
सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूलची विदयार्थीनी खुशी गवस ही पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा २०२२ मध्ये शहरी विभागात ६८. ४५ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात २३ वी व तालुक्यात ६ वी येत शिष्यवृतीसाठी पात्र ठरली आहे. तिला शिक्षिका सिद्धी गोसावी यांनी गणित विषयासाठी विशेष मार्गदर्शन केले. तसेच मारिया पिंटो, स्मृती गवस, फिरदोस ख्वाजा या शिक्षकांचेही मार्गदर्शन लाभले .
सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु. खुशी गवस हीचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.