
वैभववाडी : कोकणसाद LIVE आणि दै. कोकणसाद आयोजित विल्बर्ट प्राॅपर्टीज प्रायोजित, सह प्रायोजक कॅमेलिन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ वैभववाडी यांच्या सहकार्याने शहरात गुरुवार 19 ऑक्टोबर सायं. 6 वा. खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथील सार्वजनिक पटांगणावर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तालुक्यातील महीलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त कोकणचं महाचॅनेल कोकणसाद LIVEच्यावतीने दरवर्षी महीलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी महीलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम होत आहे. वैभववाडीत गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
प्रथम तीन विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तालुक्यातील महीलांना यानिमित्ताने पैठणी जिंकण्याची संधी चालून आली आहे. महीलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कोकणसाद LIVE यांच्यावतीने करण्यात आले आहे.










