कणकवलीत रंगणार 'खेळ पैठणीचा' | 'पाटील भावोजी' करणार धमाल !

कोकणसाद लाईव्ह प्रस्तुत, ओडिसी इलेक्ट्रिक बाइक व स्कूटर प्रायोजित धमाल शो
Edited by:
Published on: October 02, 2022 22:24 PM
views 639  views

कणकवली : कोकणचे नंबर वन महाचॅनेल कोकणसाद लाईव्ह प्रस्तुत, ओडिसी इलेक्ट्रिक बाइक व स्कूटर प्रायोजित 'खेळ पैठणीचा' हा महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम उद्या सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता कणकवली येथे बाजारपेठ मित्र मंडळ, संदेश पारकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या मंडपात आयोजित करण्यात आला आहे.अनुभवी सूत्रसंचालक आणि निवेदक 'पाटील भावोजी' हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे. 

खेळ पैठणीचा हा महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठीचा तसेच महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व ज्ञानात्मक प्रबोधनाचा रंगारंग कार्यक्रम कणकवली नगरीत रंगणार असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.