वेंगुर्ल्यात महिलांसाठी 'खेळ पैठणीचा'

शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: October 03, 2024 06:51 AM
views 375  views

वेंगुर्ला : शिवसेना वेंगुर्ला महिला आघाडीच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जागर स्त्री शक्तीचा "खेळ पैठणीचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ला कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता हा खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. 

   या स्पर्धेसाठी विजेत्या महिलेला आकर्षक पैठणी, उपविजेत्या महिलेला सोन्याची नथ, तृतीय क्रमांक प्राप्त महिलेला गळ्यातील ठुशी देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू तर उपस्थित महिलांमध्ये लकी ड्रॉ कुपनही काढले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सूत्रसंचालक समीर चराटकर सूत्रसंचालन करणार आहेत.

 याबाबत अधिक माहितीसाठी महिला तालुका संघटक दिशा शेटकर, महिला उपजिल्हा संघटक शीतल साळगावकर व महिला शहर संघटक ऍड श्रद्धा परब-बाविस्कर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.