कोकणसाद LIVE च्या देवगडातल्या 'खेळ पैठणी'च्या श्रेया लोके ठरल्या मानकरी

थेट प्रक्षेपण ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 17, 2023 15:32 PM
views 203  views

देवगड : नवरात्रीनिमित्त कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE आणि दै. कोकणसादच्यावतीने महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' या खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. विल्बर्ट प्रोपार्टी प्रायोजित आणि कॅमलिन सहप्रायोजित हा कार्यक्रम होतोय. देवगडात 16 ऑक्टोबरला श्रीकृष्ण मंदिर न्यास येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. श्रेया श्रीधर लोके या पैठणीच्या मानकरी ठरल्या. 


'खेळ पैठणी' या कार्यक्रमाचे देवगड जामसंडे येथील श्री.कृष्णमंदिर न्यास येथून थेट Live प्रेक्षपण करण्यात आले होते. त्यामुळे घराघरात हि स्पर्धा मोठ्या उत्सुकतेने पाहिली गेली. या स्पर्धेत एकूण ५३ महिलांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अंतिम विजेत्या ३ क्रमांकांना मिळून १५ हजारांची बक्षीस कोकणसाद Live, दैनिक कोकणसाद कडून देण्यात आली. यामध्ये १८१ गुणांसह प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सौ.श्रेया श्रीधर लोके हिने पटकावले. कोकणसाद Live च्या संपादक देवयानी वरसकर यांच्या हस्ते मानाची पैठणी व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच १७२ गुणांसह द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मृणाली अभिषेक सांगळे हिने पटकावले तिला दैनिक कोकणसादचे संपादक संदिप देसाई यांच्या हस्ते मानाची पैठणी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच १६२ गुणांसह सौ.वैदेही वैभव फणसेकर या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या यांना श्रीकृष्ण मंदिर न्यासचे विश्वस्थ मधुसुदन फाटक व देवगड पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांच्या हस्ते पैठणी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खेळ पैठणीचा या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिला स्पर्धकांना कोकणसाद Live कडून प्रमाणपत्र देण्यात आले.  मोठ्या संख्येने महिला वर्ग स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्या मुळे सहभागी सर्व स्पर्धकांचे कोकांसाद Live कडून आभार मानण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर कोकणसाद Live च्या संपादिका देवयानी वरसकर, दैनिक कोकणसादचे संपादक संदिप देसाई, जाहिरात हेड समीर सावंत, देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्या प्रसाद गावकर, श्रीकृष्ण मंदिर न्यास प्रमुख विश्वस्थ मधुसूदन फाटक आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी गुणलेखनाचे काम सुनील गावकर यांनी पाहिले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी करत रंगत आणली. हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह करण्यासाठी कोकण साद Live च्या टीम ने मोलाचे सहकार्य केले. IT हेड विद्देश धुरी, अनिकेत नार्वेकर, कॅमेरामन प्रसाद कदम, साहील बागवे, कोकणसाद Live कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे, देवगड प्रतिनिधी नागेश दुखंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.