कोकणसाद LIVE च्यावतीने 'खेळ पैठणी'चा

देवगडात 16 ऑक्टोबरला आयोजन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 15, 2023 16:16 PM
views 100  views

देवगड : देवगड - जामसंडे येथे कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVEच्यावतीने 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 16ऑक्टोबरला श्री.कृष्ण मंगल कार्यालय येथे सायंकाळी ४. वा. हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचे live प्रक्षेपण होणार असून प्रथम तीन क्रमांकांना पैठणीसह आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत. वयाची कोणतीही अट नाही व कोणतीही फी नाही. आज रात्री पर्यंत आपली नावे कळवावीत. पहिल्या 50 जणांना प्राधान्य दिले जाईल. तुमचे नातेवाईक व मैत्रिणीही भाग घेऊ शकतात. नावनोंदणीसाठी सौ.सरोज सुनील गावकर यांना ९४०५९२८१०० या क्रमांकावर संपर्क साधा.