केसरकरांकडून ठाकरेंचा खरपुस समाचार

कोकण विकासासाठी राणे - केसरकर कटिबद्ध : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: May 05, 2024 11:57 AM
views 135  views

सावंतवाडी : नारायण राणेंना दिलेला बुके हा स्वागताचा नाही तर विजयाचा होता. काही लोक टीका करतात. मात्र, उत्तर ऐकायची तयारी त्यांची नसते. म्हणून, महिनाभर आधीपासून हा गांधी चौक बुक करून काहींनी ठेवला होता. पण, परवानगीचा अर्ज दिला नाही म्हणून गांधी चौक आम्हाला मिळाला. टीका करणाऱ्यांनी उत्तर ऐकायची पण तयारी ठेवावी असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उबाठा शिवसेनेला लगावला. काल एक तरूण इथे येऊन गेले. जमीनीवर उतरणारी ही लोक नाही. केवळ एकत्र बॅंनर नाही तर विकासात देखील नारायण राणे व दीपक केसरकर सोबत दिसतील. केवळ आमच्या बॅंनरकडे बोट दाखवू नका, तुम्ही किती विकास केलात याच उत्तर द्या असा टोला हाणला. 

अमित शहा माझ्यासोबत होते. मुख्यमंत्रीपदावर तडजोड होणार नाही हे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत जाण्याआधीच उद्धव ठाकरे यांना सांगितले होतं. त्या बदल्यात पालघरची जागा ठाकरेंनी घेतली होती. आम्हाला सांगितल की शिवसैनिक मुख्यमंत्री होणार. मात्र, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. कुणीतरी विनायक राऊत येणार आणि आमच्यावर बोलणार हे योग्य नाही. आमची संस्कृती आदरातिथ्य करणारी आहे. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, शिवराम राजेंचा वारसा आम्हाला आहे. विनायक राऊत यांच्यासारखी माणसं काहीही करत नाहीत केवळ बोलत असतात. अडीच वर्षांत साधी पाणबुडी ते खरेदी करू शकले नाहीत. आम्ही काम करतो म्हणून लोक आमच्यावर प्रेम करतात. ज्यांची डिपॉझीट जप्त होतात त्यांच्यावर अधिक बोलणार नाही. मोदींच्या भाषेत सांगायचे तर असे अतृप्त आत्मे असतात. जिल्ह्याच्या विकासावेळी आम्ही भांडण केलं नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एक होतो. आमच्यात वैचारिक मतभेद होते. पण, वैयक्तिक नव्हते. आम्ही आमचं वचन पाळलं आता मी दिलेलं वचन तुम्ही पाळा असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं. 

अनेक विकासकामे, योजना आमच्या माध्यमातून मतदारसंघात होत आहे. सावंतवाडी शहर वेगाने काम करत आहे. १०० कोटी रूपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शहराला दिले. ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देऊ शकले नाही. त्यांनी कॉग्रेसशी लाचारी पत्करली होती. त्यामुळे निधी देण्याचे अधिकार ठाकरेंना नव्हते. शिवसेनेला केवळ ४५ हजार मत इथे मिळतं होती. मी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर १ लाख ५५ हजारांवर ती मत गेली. त्यामुळे कुणी कुणावर बोलावं ? हा प्रश्न आहे. उन्हात प्रचार केला कारण 

कोकणी मनुष्य शब्द देतो तो पाळतो. दोन दिवस बाजारपेठेत उन्हात फिरलो, नारायण राणेंचा प्रचार केला. त्यामुळे मताधिक्य मिळेलच. शहरासह गावागावात ९० टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करा असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं. नारायण राणे कोकणी आहे. कोकणी असल्याचा त्यांना अभिमान आहे तसा मलाही आहे. भारतातील पाचव्या क्रमांकाचे ते मंत्री आहेत. आजची सभा ही टीका करायची नाही. नाहीतर बरंच काही लिहीलेल होत. पण, आज ते बोलणार नाही. भाजपात माझे अनेक मित्र असताना मी बाळासाहेबांच्या विचारांसाठी शिवसेनेत गेलो. बाळासाहेबांचा विचार सोडणाऱ्यांनी हिंदूत्वावर बोलू नये. आदित्य ठाकरे खोक्यांवर बोलले, त्यांनी लक्षात घ्यावं लहान मुलं खोक्यासोबत खेळ असतात. व्हॅनिटीच पंधरा दिवसांच भाड मी भरू शकतो. मी तर स्टार प्रचारक आहे, माझा पक्ष ते भाड भरतो. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी बोलू नये. आमची फुकट बदनामी करू नये.  काम करणारी आम्ही माणसं आहोत. आदित्य ठाकरे हे राजेशाही जीवन जगणारे, काम वगैरे त्यांना माहित नसतात. तर आम्ही बाहेर पडलो तेव्हा उद्धव ठाकरे ठणठणीत बरे झाले. नाहीतर कॉंग्रेसच्या दावणीला बांधले गेले होते असा हल्लाबोल केला. 

अनेक विकासकामे केलीत. पण, युवक, महिलांना रोजगार देण्याच काम आम्ही करू. येत्या पाच वर्षांत असं काम करू की ठाकरेंना बोलायला पुन्हा काही शिल्लक रहाणार नाही. तुमच्या मतांमुळे नारायण राणे तर पुन्हा मंत्री होतीलच त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीही पुन्हा पंतप्रधान होतील‌ असं मंत्री केसरकर म्हणाले. उबाठानं केवळ प्रकल्प रोखण्याच काम केल‌, विकास आम्ही केला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीकरांना केलं. गांधी चौक येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. नीता कविटकर, मनसेचे अँड. अनिल केसरकर, राजन पोकळे, अँड. राजू कासकर, सचिन वालावलकर, बबन राणे, प्रेमानंद देसाई, नितीन मांजरेकर, रुपेश पावसकर, अशोक पवार, रमाकांत जाधव, अनारोजीन लोबोअ आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.