खारेपाटण - भुईबावडा रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल ठाकरे शिवसेना करणार रास्तारोको : मंगेश लोके

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 30, 2023 15:04 PM
views 165  views

वैभववाडी : खारेपाटण -भुईबावडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे.साडेतीन कोटी रुपये खर्चून करण्यात आलेला रस्ता चार महीन्यात उखडला आहे.सदर रस्ता ठेकेदाराकडून पून्हा करून घ्यावा.काम नव्याने करून घेतल्याखेरीज त्यांचे बील अदा करू नये.अन्यथा ठाकरे शिवसेना रास्तारोको करणार आहे असा इशारा ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी दिला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना ठाकरे शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.

खारेपाटण -भुईबावडा मार्गावरील ५ किमी लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी ३कोटी ४८ लाख रुपये मंजूर झाले होते.मात्र ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे.मे महीना अखेरीला केलेल्या या कामाला खड्डे पडले आहेत.तसेच अनेक ठिकाणी कारपेट वाहून गेले आहे.याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे असा आरोप श्री लोके यांनी केला आहे.या विभागाकडून कामांच्या निविदा कोटीमध्ये काढल्या जातात मात्र काम लाखांमध्ये होते.

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला हा.बा. विभागाकडून अभय दिले जाते.सत्ताधारी पक्षातील बेनामी ठेकेदारी याला जबाबदार आहे.यातूनच या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे.हे काम पुन्हा नव्याने करून घ्यावे तसेच हे काम पूर्ण झाल्याशिवाय कामचे बील अदा करू नये.अशी मागणी केली आहे.