
देवगड : देवगड आगारातील खारेपाटण - देवगड एसटी ला देवगड कट्टा येथे दुपारी १.३०च्या सुमारास अपघात झाला असून ट्रक व एसटीमध्ये हा अपघात होऊन देवगड कट्टा येथे हा अपघात झाला त्यात एसटी चालकस दुखापत झाली आहे. ही घटना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडला घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
देवगड तालुक्यातील देवगड कट्टा येथे ट्रक व एसटीमध्ये झालेल्या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.हा अपघात दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार देवगड आगारातील खारेपाटण देवगड ही एसटी देवगड कट्टा येथे दुपारी 1.300 वाजण्याच्या सुमारास आली असता ट्रक व एसटी मध्ये समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.मात्र एसटीमध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे.याघटनेची माहिती मिळताच देवगड आगाराचे स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर गंगाराम गोरे तसेच देवगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.