खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. एम. बी. चौगले

Edited by:
Published on: November 10, 2023 15:17 PM
views 131  views

वेंगुर्ला : बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एम.बी.चौगले यांची संस्थेच्यावतीने नियुक्ती करण्यात आली. प्रा.चौगले यांनी महाविद्यालयातील अनेक समितीवर प्रभावीपणे काम केलेले असून गेली दहा वर्ष ते यशवंतराव मुक्त विद्यापीठाच केंद्र संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, संस्थेच्या अध्यक्ष शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी विशेष अभिनंदन केले तर माजी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर यांच्या हस्ते प्रा.चौगले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.