...तर जशास तसं उत्तर देऊ !

ठाकरेंना दीपक केसरकरांचा इशारा
Edited by: विनायक गावस
Published on: May 02, 2024 13:35 PM
views 311  views

सावंतवाडी : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी कोकणात याव, उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा. आमच्यावर आमच्या नेत्यांवर बोलाल तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंना दिला. 

ते म्हणाले, खासदार विनायक राऊत केवळ खोटा प्रचार करू शकतात. लोकांची दिशाभूल करण्याच काम विनायक राऊत यांनी आजवर केलं. विकासाच्या बाबतीत राऊत काहीही करू शकले नाही. त्यांचा हा खोटा प्रचार फार काळ चालणार नाही. मला वाटतं होतं की राज्यात एकच राऊत असे आहेत. पण, हे राऊत देखील त्यांच्यासारखेच निघाले असा टोला संजय राऊत यांच नाव न घेता दीपक केसरकर यांनी लगावला. तर महिलांमध्येही मोठा उत्साह पहायला मिळत असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.