
सावंतवाडी : सोशल मिडियावर झळकण्यासाठी मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या 'तुतारी' स्मारकाच्या ठिकाणी अवमानकारक वर्तन करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातून कविवर्य केशवसुतांच्या स्मारकाचा अवमान झाला असून हा प्रकार साहित्यिकांसह सावंतवाडीकरांच्या भावनांना ठेच पोहचवणारा आहे. या घटनेचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्यावतीनं तीव्र निषेध करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी कोमसाप शाखा सावंतवाडीच्यावतीनं पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.