
वेंगुर्ला : भारत देश आता विविध विकासातून उदयाला येत आहे. गोव्याच्या एकदम जवळ असलेला रेडी गाव आहे. या गावाच्या विकासाच्या संकल्पनेनुसार विविध पर्यटन व्यवसाय येथे होऊ घातलेले आहेत. मायनिंग प्रमाणेच पर्यटनातून विकास या भागाचा होत आहे. मी कधीच पक्षाच्या माध्यमातून विकास कामांना विरोध केलेला नाही. येत्या काळात रेडी गावाची पर्यटन गाव म्हणून ओळख करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. माऊलीचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. शिरोडा येथे ताज प्रकल्पाचे भूमिपूजन झाले यामुळे आता ६० कोटी येथील भूमिपुत्रांना मिळणार आहेत. रेडी आणि पंचक्रोशीच्या विकासासाठी जो निधी लागेल तो पुढील काळात दिला जाईल असे प्रतिपादन महायुतीचे सावंतवाडी विधानसभेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी केले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ रेडी येथून गावभेट दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी रेडी, शिरोडा, आसोली, आरवली, सागरतीर्थ, अणसूर, पाल, मोचेमाड, उभादांडा असा झंझावाती दौरा केला. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, युवक जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, माजी जि. प. सदस्य विष्णूदास उर्फ दादा कुबल, प्रितेश राऊळ, मच्छीमार नेते वसंत तांडेल, दादा केळूसकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, तालुका संघटक बाळा दळवी, महिला उपजिल्हा संघटक शितल साळगांवकर, तालुका महिला संघटक दिशा शेटकर, वेंगुर्ले खरेदी व विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, महिला सरपंच संघटनेच्या अध्यक्षा सरपंच यशस्वी सौदागर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सुहास कोळसूलकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, भाजप शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, काशिनाथ नार्वेकर, युवासेनेचे स्वप्नील गावडे, सागर गावडे, कौशिक परब, सलील नाबर, भाजपचे हेमंत गावडे, तुषार साळगावकर, प्रणव वायंगणकर, प्रसाद पाटकर, मनोहर तांडेल यांच्यासाहित महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार शंकर कांबळे म्हणाले, केसरकर यांनी सिंधूदुर्ग जिल्हासह सावंतवाडी मतदारसंघात पर्यटन विकासाची केलेली कामे तसेच सिंधूरत्न मधून युवक महिला बचत गट, शेतकरी, मच्छीमार यासह अनेकांना विविध व्यवसायातून दिलेले प्रोत्साहन हे महत्त्वाचे आहे. त्यातून हजारो महिला पुरुष यांना रोजगाराचे साधन उपलब्ध झालेले आहे. गेल्या काही वर्षात दीपक केसरकर यांनी करोड रुपयांच्या निधीतून केलेला विकास हा प्रत्यक्षदर्शी समोर असतानाही विरोधकाकडून त्यांच्यावर होणारे आरोप हे चुकीचे वाटतात. त्यामुळेच आपण या विधानसभेच्या निवडणुकीत दीपक भाईंच्या पाठीशी ठाम राहून काम करणार पण पुढील निवडणुकात आपण राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे यावेळी बोलताना जाहीर केले.
रेडी गावचे रक्षण करणे हे कर्तव्य - दीपक केसरकर
काही लोक रेडीच्या जमिनी लुटायच काम करत आहेत. रेडी गावातील या शेतकऱ्यांचे रक्षण कारण हे आपलं कर्तव्य आहे. अब्जावधी रुपयाची रक्कम रेडी गावातील जमिनीची घेण्यात आली. आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. रेडीला मोठे भवितव्य आजे. पुढील काळात रेडीचा संबंध विकासासाठी राहील असेही यावेळी दीपक केसरकर म्हणाले.