
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांचे बंधू तुषार व सौ. धनश्री यांचा विवाह संपन्न झाला. यानिमित्ताने राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी नवं दांपत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी गुरूनाथ राऊळ, उबाठा शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांच्यासह राऊळ परिवार उपस्थित होता. राजकारणापलीकडचं चित्र यानिमित्ताने पहायला मिळालं.