
सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेत पक्षप्रवेशांचा धडाका लावला आहे. रविवारी रात्री मोचेमाड ग्रामस्थांनी धनुष्यबाण हाती घेत दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. जिल्हा समन्वयक सुनिल डुबळे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश घेण्यात आला.
माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, साधना डोंगरे, मंगेश डोंगरे, आरवली माजी सरपंच सौ. सावंत, गुंडू गावडे, जया गावडे, आबा गावडे, अमित गावडे आदींसह मोचेमाडच्या ७२ ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला. श्री. केसरकर यांना बहुमताने विजयी करणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितांकडून व्यक्त केला.
केसरकर म्हणाले, विरोधी उमेदवार तुमच्या उपयोगात कधी आले नाही. केवळ माथी भडकवण्याचे काम त्यांनी केलं. माझ्यामाध्यमातून अनेक विकासकामे या भागात झालीत. पंचतारांकित हॉटेल उभ राहिले. पर्यटनाच्या योजना सुरू केल्या. राज्याची जबाबदारी असल्याने मतदारसंघात फिरता आले नाही तरी माझं लक्ष तुमच्यावर असतं. गावातील समस्या माझ्या माध्यमातून सोडविल्या गेल्यात असे मत त्यांनी व्यक्त केल. आपली ताकद काय आहे हे विरोधकांना दाखवून द्या असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले. यावेळी निवृत्ती सातार्डेकर, नियती सातार्डेकर, लवू सातार्डेकर, केशव सातार्डेकर, यशवंत नाईक, यशोधा नाईक, कविता गावडे, नितिन वरगावकर, दादा मोचेमाडकर, भैरवी गावडे, सुरज गावडे, संजना बाबर, उषा पडते आदींसह मोचेमाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.