उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची केसरकरांना भिती : रूपेश राऊळ

Edited by:
Published on: February 02, 2024 09:49 AM
views 467  views

सावंतवाडी : आपल अपयश बाहेर पडेल म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे घाबरले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची भिती त्यांना वाटत आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी यांना मंत्रीपद दिलं त्या उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याची केसरकरांची पात्रता नाही अशी टिका उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली. दरम्यान २० महिने झाले केसरकर यांना मंत्रीपद मिळून. तरीही त्यांनी मतदारसंघासाठी काही केले नसल्याने ते वैफल्यग्रस्त होऊन उद्धव ठाकरेंवर बोलत आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे प्रथमच जनसंवाद यात्रा काढत असून त्याची सुरुवात ही सावंतवाडीतून होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण असून त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सावंतवाडीत जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचा दौरा नेहमी हा कोकणच्या हितासाठीच असतो ते कोकण दौऱ्यावर आले तर कोकणी जनतेला काय ना काही तरी देऊनच जातात. त्यामुळे आता कुठेतरी आपलं अपयश बाहेर पडेल म्हणून केसरकर हे वैफल्यफळग्रस्त झाले आहेत. ठाकरेंवर टीका करत आहेत. परंतु 2014 मध्ये केसरकर हे शिवसेनेत आल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी प्रथमच मंत्रिपद दिलं. पात्रता नसताना केसरकारांना मंत्रिपद देऊन देखील केसरकर हे बेईमान झाले. ते नाहक उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनताच केसरकरांना धडा शिकवेल अशी टीका देखील रुपेश राऊळ यांनी यावेळी केली.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा,शहर प्रमुख शैलेश गावंढळकर,अशोक परब,आबा केरकर,अशोक धुरी आदी उपस्थित होते.