
सावंतवाडी : माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. डोंबिवली विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-महायुतीला मिळालेल्या महाविजयाबद्दल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांच्याकडू भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रविंद्र चव्हाण यांच्याकडूनही दीपक केसरकर यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या गेल्या.