
सावंतवाडी : प्रॉपर्टी विकून सिंधुदुर्गात शिवसेना वाढली म्हणून सांगणारे दीपक केसरकर हे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत का यश मिळू शकले नाहीत ? असा सवाल ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, तुम्ही जर खोके घेतले नाहीतर तुम्हाला एवढे झोमते कशाला ? असाही उपरोधिक टोला रूपेश राऊळ यांनी लगावला आहे.
यावेळी पुढे बोलताना रूपेश राऊळ म्हणाले, नितेश राणे यांनी काल आमदार दीपक केसरकर यांना निवडून आणावे लागेल, असे म्हटले आहे. यावरून कळत की दीपक केसरकर हे निवडून येऊ शकत नाहीत, असे नितेश राणेंच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे केसरकर यांनी 2024 ला उभे राहावे, शिवसेना त्याचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ही राऊळ यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जि.प माजी सदस्य मायकल डिसोजा आदी उपस्थित होते.