
सावंतवाडी : प्रत्येक निवडणुकांमध्ये समोरच्या उमेदवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे हा सुद्धा दहशतवाद आहे. विकासकामावरती न बोलता केसरकर यांचा रडीचा डाव सुरू आहे. एकही आमसभा ते घेऊ शकलेले नाहीत. सामान्य जनतेला ते वेळ देऊ शकले नाहीत असा टोला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी हाणला.
ते म्हणाले, कॉयर उद्योगाच काय झालं ? बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीमध्ये किती सदनी अधिकारी घडवले ? आंबोलीच्या घाट रस्त्यावरती अनेक अपघात होत आहेत. अपघातांची मालिका सुरू आहे. तिथे कधी लक्ष दिले नाही. सामान्य जनतेला कष्टकऱ्यांना विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना कधीच केसरकर वेळ देऊ शकले नाहीत अशी टीका बबन साळगावकर यांनी केली.