केसरीच्या तरुणाने संपवलं जीवन

Edited by: विनायक गांवस
Published on: December 24, 2024 16:07 PM
views 640  views

सावंतवाडी : केसरी- धनगरवाडी येथील धुळू मळू डोईफोडे (वय ४५) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा युवक सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. घराशेजारी त्याने आत्महत्या केली असून पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे . त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे