दुर्गम निडलीसह केर गावाला भरघोस निधी देणार

शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांची ग्वाही
Edited by: संदीप देसाई
Published on: February 07, 2024 15:12 PM
views 120  views

दोडामार्ग : केर गावातील निडलीवाडी विकासापासून थोडी दूर होती, मात्र आमच्या सरकारने  विकासकामासाठी निधी देऊन या वाडीला विकासाच्या कक्षेत आणले आहे. यापुढेही निडलीवाडीसह केर गावाला भरघोस निधी दिला जाईल अशी ग्वाही शिवसेना (शिंदेगट) तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी दिली.

केर गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ बुधवारी संपन्न झाला. यावेळी तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र निंबाळकर, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई, उपतालुका प्रमुख दादा देसाई, महिला तालुका प्रमुख चेतना गडेकर, महिला उपतालुकाप्रमुख सर्पोरा शेख, केर सरपंच रुक्मिणी नाईक, उपसरपंच तेजस देसाई, सदस्य गायत्री देसाई, लक्ष्मण घारे, शहरप्रमुख शीतल हरमलकर, विभागप्रमुख सानवी गवस, झोळंबे सरपंच राजेश देसाई, रामदास मेस्त्री, रेखा लोंढे, ठेकेदार सचिन देसाई, माजी विस्तार अधिकारी रामा ठाकूर उपस्थित होते. 

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी श्री. निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष श्री. देसाई यांनीही केर गावाच्या विकासासाठी निधी मिळण्यासाठी मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी केली जाईल आणि नेहमी झुकते माप असेल असे सांगितले. निडलवाडीच्यावतीने येथील जेष्ठ ग्रामस्थ विष्णू देसाई, नवल गावडे यांनी आवश्यक विकासकामाची मागणी केली त्यानंतर उपस्थित प्रतिनिधीनी विकासनिधी देण्याची ग्वाही दिली.