
देवगड : देवगड तालुक्यातील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीउल्लेखनीय कामगिरी करत पाच कला प्रकारांमध्ये भरघोस यश संपादन केले आहे. युवा महोत्सवात देवगड येथील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत झालेल्या ५८व्या युवा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करत पाच कला प्रकारांमध्ये भरघोस यश संपादन केले.
शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत झालेल्या ५८व्या युवा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करत पाच कला प्रकारांमध्ये भरघोस यश संपादन केले आहे.
(सुवर्ण पदक) साहिल दिलीप जाधव, शिवमणी पाळेकर, विनीत चव्हाण, योगीराज नार्वेकर, ऋत्विज गावकर, अभिषेक शिंदे,
पार्थ नाईकधुरे व हर्षद मेस्त्री. कथाकथन मराठी (रौप्य पदक) नुपूर लळीत. स्पॉट फोटोग्राफी (कांस्य पदक) तनिष नाईक.
हिंदी स्किट (उत्तेजनार्थ पदक) ईश्वरी शंकरदास, सानिका कावले, राधिका माने, श्रद्धा म्हापसेकर, श्रेया नाईकधुरे, स्नेहल वाघट, अभिषेक शिंदे व हर्षद मेस्त्री.
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे शिक्षण विकास मंडळ देवगडचे पदाधिकारी, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि सर्व कर्मचारी वर्गाने मनःपूर्वक अभिनंदन केले असून, विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या कामगिरीमुळे स. ह. केळकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रातील वर्चस्व आणखी अधोरेखित झाले आहे.










