
दोडामार्ग : कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कळणे संचलित नूतन विद्याहास्य कवी अशोक नायगावकर आणि वात्रटिकाकार चित्रपट दिग्दर्शक रामदास फुटाणेलय कळणे या प्रशालेमध्ये मराठी आठव दिवस या बॅनरखाली महाराष्ट्रातील ख्यातनाम व साहित्यिक, विविध राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, हास्य कवी अशोक नायगावकर आणि वात्रटिकाकार चित्रपट दिग्दर्शक रामदास फुटाणे यांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी २७ जानेवारीला सकाळी १० वाजता करण्यात आला आहे.
शाळेतील तसेच तालुका जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यांना पुस्तक ज्ञानाबरोबर समाजातील इतर ज्ञानात भर पडली पाहिजे. आपला विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी पडता कामा नये असे सदोदित प्रयत्नात असणारे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मोहनराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
मराठी भाषेला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठीला कविता गद्य आणि नाट्यकृतीचा मोठा इतिहास असलेली समृद्ध साहित्यिक परंपरा आहे. मराठी भाषा समाजाचे अनन्यसाधारण सांस्कृतिक ओळख जपण्यात आणि संवर्धन करण्यातही ती महत्त्वाची भूमिका बजावते. याव्यतिरिक्त भाषेने साहित्य कला सिनेमा आणि संगीत यासारख्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे मराठी भाषा ही सौंदर्याची खाण आहे हे प्रत्यक्ष आपल्यासमोर *मराठी आठव दिवस* या बॅनर खाली बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. यावेळी प्राध्यापक अशोक बागवे, कवी इंद्रनिल घुले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ, ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे, मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी व जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक सतीश पाटणकर उपस्थित राहणार आहेत.
देश विदेशात कवितेच्या मैफली गाजवणारे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नामवंत कवी अशोक नांयगावकर हे या संवाद व काव्यमैफिलीत दिलखुलास कविता मांडणार आहेत. तसेच मराठी साहित्यातील कवी, विडंबन कवी, वात्रटिकाकार चित्रपट दिग्दर्शक, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे हेही उपस्थित राहणार आहेत. कर्तृत्वान मराठी बांधवांना एकत्र आणून शोध मराठी मनाचा या संमेलनाची सुरुवात त्यांनी केली. त्यांची हास्य कविकार म्हणून त्यांची ओळख आहे. फुटाणे यांना सामना चित्रपटासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर पुरस्कार, सात राज्यस्तरीय पुरस्कार, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट राज्य पुरस्कार, बालकवी राज्य पुरस्कार, गोवा कला अकादमीचा काव्य पुरस्कार अशा विविध पुरस्काराने फुटाणे यांचा गौरव झाला आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव गणपत देसाई, उपाध्यक्ष सखाराम देसाई, मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांनी केले आहे.