उभादांडा येथील कवितेच्या गावचे उद्या उदघाटन व लोकार्पण

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: दिपेश परब
Published on: March 09, 2024 14:21 PM
views 222  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने  साकारलेल्या कवितेच्या गावचे उदघाटन व लोकार्पण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते  उद्या १० मार्च रोजी ४.३० वाजता संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने उभादांडा कवितेच्या गावचे उदघाटन व लोकार्पण मंत्री केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व वाचक प्रेमी, कविताप्रेमी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सचिन वालावलकर यांनी केले आहे