पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्काराने कविता सावंत सन्मानित

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 31, 2023 20:21 PM
views 680  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील नाटळ धाकटे मोहूळ येथे राहणाऱ्या कविता समीर सावंत यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  महिला सन्मान पुरस्कार आज कणकवली नाटक ग्रामपंचायत येथे सरपंच सुनील घाडीगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


कविता सावंत यांनी विविध सामाजिक कामात सक्रिय असतात तसेच त्यांनी भवानी प्रतिष्ठान हा बचतगट सर्वप्रथम स्थापन केला. स्थानिक महिलांची बांधणी करून त्यांच्यातर्फे भजन, फुगडी, उत्पादित वस्तूंचे स्टॉल लावणे हे उद्योग करून आपल्या परिसरातील महिलांचे सक्षमीकरण केले. रामेश्वर सप्ताह वेळी देखील यांचा स्टॉल असतो. शिवाय शैक्षणिक प्रगती करणाऱ्या मुलांचा मुलांचे देखील बचत गटाच्या माध्यमातून सत्कार देखील करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सहेली बचत गट स्थापन केला. त्यात 13 सदस्य आहेत.2018 ते 22 या कालावधीत नाटळ ग्रामपंचायत मधील सर्व समित्यांमध्ये त्या सदस्य होत्या. नाटळमधील प्रगती ग्राम संघाच्या त्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत.

शिवाय हिरकणी प्रभाग संघाच्या सदस्य असून या संघाच्या नियंत्रणाखाली नाटळ - 44, दिगवळे - 30, दारिस्ते 25, सांगवे - 35 अशी महिलांची सदस्य संख्या या हिरकणी प्रभाग संघाच्या आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. या उक्तीनुसार त्या कार्यरत असताना आपल्या पतीला म्हणजेच समीर यांना ग्रामविकासचे सेक्रेटरी म्हणून कामासाठी देखील प्रोत्साहीत करतात.

शिक्षण M.A. पर्यंत झालेल्या कविता यांचा स्वतःच्या आणि बचतगटाच्या उत्पादित वस्तूंचे दुकान कणकवली, रेल्वे जवळ आहे . नेहमी व्यस्त असणाऱ्या कामातून देखील या सामाजिक काम करत असतात त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.