
सिंधुदुर्गनगरी : नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान यांच्या संभाव्य दौऱ्याचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने व वाहतुकीचे योग्य विनियमन करण्यासाठी मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, मालवण शहर याठिकाणाचे आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत.
मालवण येथील राजकोट व तारकर्ली येथे दि. 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल विभागामार्फत नौदल दिन 2023 या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व नौदल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यमास पंतप्रधान महोदयांसह इतर अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने VVIP यांचे वाहन ताफे मौजे देऊळवाडा- बोडींग ग्राउंड- राजकोट – तारकर्ली MTDC मालवण शहरातून जाणार आहेत. तसेच VIP यांचे वाहन ताफे कसाल मालवण असे मालवण शहरातून जाणार आहेत. यावेळी आवठवडा बाजार भरला तर मोठ्या प्रमाणावर वाहनाची गर्दी होऊन VVIP यांचे वाहन ताफ्याला अडथळा निमार्ण होऊ शकतो.
त्यादृष्टीने पोलीस अधीक्षक यांनी पंतप्रधान भारत सरकार यांच्या संभाव्य दौऱ्याचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने VVIP व VIP यांच्या वाहनांचे ताफे जाणाऱ्या गावातील/ शहरातील आठवडा बाजार बंद करण्याबाबत विनंती करण्यात आलेली होती. त्यानुसार चौके, कट्टा व मालवण बाजार बंद ठेवण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेला होता. तहसिलदार मालवण यांनी पारीत केलेल्या आदेशातील बाजाराच्या दिनांकामध्ये बदल करण्याबाबत कळविले आहे.
पंतप्रधान भारत सरकार यांच्या संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने व वाहतुकीचे योग्य विनियमन करण्यासाठी पारित केलेल्या आदेशातील बाजार बंद ठेवणेच्या दिनांकामध्ये बदल करुन बाजार व जत्रा अधिनियम 1962 चे कलम 5 (ग) नुसार जिल्हाधिकारी किशोर तावाडे यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन नौसेना कार्यक्रम दिनानिमित्त पुढीलप्रमाणे नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करीत आहे. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार दिनांक 6 डिसेंबर 2023 नंतर अन्य दिवशी भरविण्यात भरविण्यास अनुमती देण्यात येत आहे.