
सावंतवाडी : कोलगाव - डोंगरवाडी येथील श्री कसबादेवी मंदिरात शनिवार २२ फेब्रुवारी रोजी श्री कसबादेवी गोंधळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दिवसभरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी १० वाजता देवीची विधिवत पूजा, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी ४ वाजता महिलांची फुगडी, रात्री ८ वाजता महाप्रसाद, त्यानंतर देवीचा गोंधळ उत्सव व रात्री १२.३० वाजता जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोलगाव डोंगरवाडी ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.