
सिंधुदुर्गनगरी : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती यामुळे कसाल मध्ये बऱ्याच घरांमध्ये पाणी आले होते. या पाण्यामुळे बरेच संसार पाण्यात वाहून गेले आहेत. काही घरे कोसळली ही आहेत. अशा सर्वांना कसाल ग्रामपंचायत वतीने तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले.
या धनादेशाचे वाटप मंगळवारी करण्यात आलं. कसाल सरपंच राजन परब, ग्रामसेवक एस बी कोकरे, उपसरपंच शंकर परब, तसेच ग्रामपंचायत सदस्य तृप्ती नारकर, गार्गी शिर्के, अर्चना राणे, संजय वाडकर, चिन्मय पावसकर, मिलिंद सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी दत्ताराम निर्गुण, प्राची राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कसाल मधील सात पूरग्रस्तांना ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीची मदत करण्यात आली ही तातडीची मदत पाहून अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळले.