
दोडामार्ग : स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत कसई दोडामार्ग नगरपंचायतला एक घंटागाडी आणि ट्रॅक्टर शासनाकडून देण्यात आली आहे. त्याचे आज नगराध्यक्ष चेतन चव्हाण व उपनगराध्यक्ष देविदास गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढून लोकांर्पण करण्यात आले. महाराष्ट्र भर सर्व नगरपंचायत ला शासनाकडून स्वच्छ शाहर व स्वच्छ महाराष्ट्र या हेतूने कचरा घंटा गाडी देण्यात आली आहे. या अभियाना अंतर्गत कसई दोडामार्ग शहर आता स्वछता की और बढायेंगे असे ध्येय धरून नगराध्यक्ष व संपूर्ण गनरपंचायत यासाठी पुरेपूर मेहनत घेणार आहे. असे चव्हाण म्हणाले लोकांर्पण सोहळ्या वेळी त्यांच्या सोबत उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, नगरसेविका, संजना म्हावळणकर, क्रांती जाधव व सर्व नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष चव्हाण बोलताना म्हणाले की कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी ओला कचरा सुखा कचरा वेगळा करून तो नगरपंचायत च्या कचरा पेटीत टाकावा आल्यावर त्या ठिकाणी नगरपंचायत कर्मचारी घंटा गाडीत वेळेत त्या ठिकाणी येणार आहे. आणि ओला कचरा सुखा कचरा याविषयीं कोणी हलगर्जी केल्यास त्याच्यावर कडक दांडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असे ते म्हणाले. त्यामुळे बसर्व जनतेने या कार्यास सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.