
दोडामार्ग : भारत सरकारच्या इंडियन स्वच्छता लीग २.० मोहिमे अंतर्गत कसई-दोडामार्ग नगरपंचायत व जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात 'स्वच्छता पंधरवडा अभियान' राबवित आहे. त्याच अनुषंगाने भेडशी रोड गणेश घाट व म्हावळणकरवाडी ITI कॉलेज जवळील गणेश घाट येथील परिसराची साफसफाई मोहीम नुकतीच राबविण्यात आली.
“स्वच्छता करणे जशी नगरपंचायतची जबादारी आहे तशीच नागरिक म्हणूनसुद्धा स्वच्छता राखणे प्रत्येकाची जबाबदारी असून गणेश चतुर्थी निमत्त आपण गणेशघाट ची साफसफाई करत आल्याचे” संविता आश्रम यांचे कर्मचारी महाबळेश्वर कामत यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमावेळी नगरपंचायतच्या नगरसेविका सौ. गौरी पार्सेकर यांच्या मार्फत स्वच्छता लीग टीशर्टचा वाटप करून स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलीय. तसेच सदर कार्यक्रमावेळी गौरी पार्सेकर यांच्याकडून स्वछागृहिना चहा नाष्टा व नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या कडून भोजनाची सोय करण्यात आली होती.
तर नगरपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छता मोहीम साठी पुढाकार घेणाऱ्या संविता आश्रमला कसई-दोडामार्ग नगरपंचायत कर्मचारी वर्गाकडून २५ किलो साखर, तेल, शेवये तसेच नगरसेवक रामराव उर्फ चंदन गावकर यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली. या कार्यक्रमावेळी कसई-दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत कसई-दोडामार्ग नगरपंचायत मार्फत आयोजित करण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धा व घरगुती इको फ्रेंडली गणपती स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सह्भाग घ्यावा असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमावेळी कसई-दोडामार्ग नगरपंचायतचे कर्मचारी वर्ग तसेच संविता आश्रम कर्मचारी वर्ग उपस्थित होते.