
दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल पुढच्या पंधरा दिवसात संपणार आहे. त्यामुळे सध्याचे विद्यमान नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा कार्यकाल काही दिवसातच संपणार असल्याने नूतन नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यापूर्वी आरक्षण निघणार असून आरक्षण काय पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनुसूचित जाती जमातीसाठी नगराध्यक्ष पद राखीव झाल्यास भाजपच्या क्रांती जाधव व आरपीआयच्या नगरसेविका ज्योती रमाकांत जाधव यांना संधी आहे. जर खुल्या प्रवर्गासाठी महिला साठी जर नगराध्यक्ष पद राखीव झाल्यास इच्छुक नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. गौरी पार्सेकर संध्या प्रसादी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या सर्व गोष्टी आरक्षणावर अवलंबून आहेत.