
दोडामार्ग : कसई- दोडामार्ग शहरात डास निर्मूलनसाठी नगरपंचायतने शहरात विशेष मोहीम हाती घेतली असून शहरात डास उत्पादक औषध फवारणी करण्यात आली.
नगरपंचायत कर्मचारी वर्गाने शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी साचून राहिले त्या जागांचा शोध घेत डास प्रतिबंध करणारी डास उत्पादक औषध फवारणी करण्यात आली. नगरपंचायतने एन डास कालावधीत पुढाकार घेतल्याने शहर वासियांनी स्वच्छता विभाग व नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि त्यांचे टीमचे आभार मानले आहेत.