
वेंगुर्ला : उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत आणि सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ला उभादांडा गावचे सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा यांची सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला विधानसभा मतदार संघांच्या अल्पसंख्याक उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
कार्मिस आल्मेडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यावेळी मोचेमाड, सागरतीर्थ, आसोली, उभादांडा ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आणण्यात त्यांचे मोठ योगदान होत. प्रत्येक निवडणूकीला त्यांनी उभादांडा विभागतून सेनेला यश मिळवून दिले होते. सामाजिक कार्यकर्ते म्हणून वेंगुर्ला नव्हे सिंधुदुर्ग मध्ये देखील त्याना मानणारा सर्व जाती धर्माचा वर्ग आहे. कित्येक पुरस्कारानी त्यांना गौरविण्यात आले आहे.
युवा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात त्याना मानणारा असल्याने या पदावर त्यांची नियुक्ती करून अब्दुल मज्जीद अब्बास बटवाले ( जिल्हा प्रमुख अल्प संख्याक, सिंधुदुर्ग ) यांच्या सहीचे पत्र त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर, शहर प्रमुख अजित राऊळ, रफिक शेख, एलवीस आल्मेडा व शिवसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याना शाल श्रीफळ व नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अल्प संख्याक महिला तालुका प्रमुख म्हणून जस्मिन तन्वीर फणसोफकर तर उपतालुका प्रमुख पदी रुबीया शहाजहांनं सय्यद यांची नियुक्ती महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले यांनी केली.