कारिवडेत 'जिल्हास्तरीय भव्य निमंत्रित भजन स्पर्धेचं आयोजन...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 12, 2024 12:31 PM
views 84  views

सावंतवाडी : माघी गणेश जयंती निमित्त कारिवडे-पेडवेवाडी ग्रामस्थांकडून 'जिल्हास्तरीय भव्य निमंत्रित भजन स्पर्धा २०२४' च आयोजन करण्यात आलं आहे. उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभ कार्यक्रम सायंकाळी ६ वा. तर निमंत्रित भजन मंडळांचे सादरीकरण सायंकाळी ७  वाजल्यापासुन होणार आहे. पारितोषिक वितरण सोहळा व तज्ञ परीक्षकांचे सादरीकरण रात्रौ ११ वा. पार पडणार आहे‌. उद्या जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा नं. २ रंगमच, कारिवडे, पेडवेवाडी, श्री देव हेळेकर देवस्थानजवळ या स्पर्धा होणार आहेत.

यामध्ये सातेरी प्रासादिक भजन मंडळ, सातोळी बुवा अमित परब,  श्री देवी माऊली भजन मंडळ, साटेली बुवा सत्यनारायण कळंगुटकर, सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ, वेंगुर्ला बुवा हर्षल मेस्त्री, दतकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी बुवा विराज तांबे, पावणाई पारसादिक भजन मंडळ, जरवली, कणकवली बुवा योगेश मेस्त्री सुश्राव्य गायन करणार आहेत. निवेदन कवी मनोहर परब करणार आहेत.

वैयक्तिक परितोषिकांसह प्रथम पारितोषिक आत्माराम (राजन) परब यांजकडून सन्मानचिन्ह व रोख रक्कम ५००१/-, द्वितीय पारितोषिक शरद परब यांजकडून सन्मानचिन्ह व रोख रक्कम ३००१/- तर तृतीय पारितोषिक

कै. रवींद्र बापू परब यांच्या स्मरणार्थ नारायण परब यांजकडून सन्मानचिन्ह व रोख रक्कम २००१/- व  उत्तेजनार्थ पारितोषिक लवू रामा बिले यांजकडून सन्मानचिन्ह व रोख रक्कम १००१/- दिल जाणार आहे. श्री देव हेळेकर देवावर उत्कृष्ट गजर सादरीकरण करणाऱ्यास कै. सौ. लक्ष्मी कृष्णा परब (पटेकर) (माजी आशा सेविका) यांच्या स्मरणार्थ कृष्णा हरिश्चंद्र परव यांजकडून १००१/- रु. पुरस्कृत व भजन स्पर्धेतील सहभागी संघ तसेच साऊंड सिस्टीम व २ परिक्षक या सर्वांसाठी सन्मानचिन्ह कै. सौ. कल्पना वसंत परब यांच्या स्मरणार्थ मनोहर परब यांजकडून पुरस्कृत करण्यात आली आहेत. या भव्य निमंत्रित भजन स्पर्धेस उपस्थित रहावं अस आवाहन आयोजकांनी केले आहे.